प्रशासकीय व्यवस्था
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. जिल्हाधिकार्यांना तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी, आठ उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका मामलतदार, विभाग अधिकारी आणि लिपिक कर्मचारी यांची साथ असते. जिल्हा प्रशासनाच्या संपूर्ण जबाबदार्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असतात आणि जिल्हा प्रशासनाशी संबंधित विशिष्ट कार्ये पाहणार्या किंवा पार पाडणार्या खालील विभागांमध्ये त्याचे वर्गीकरण केले आहे.